🕒 1 min read
मुंबई: अभिनेत्री करीना कपूर खानने तैमूर अली खानचा मित्राबरोबरचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर खूप अ;ॅक्टिव असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती बर्;याचदा तैमुरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
तैमूरचा सर्वात खास मित्र रणवीरच्या वाढदिवशी करीना कपूरने मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये तैमूर आणि त्याचा मित्र रणवीर मजा करताना दिसत आहे. या फोटोमध्ये तैमूर स्वत: करीना कपूरसारखा पाउट करीत आहे.

करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर तिने तिथे लिहिले कि, ‘टीम तुझी आठवण काढत आहे लवकरच परत ये’ असे करीनाने म्हटले आहे.
यापूर्वीही करीनाने इनाया बरोबर तैमूरचे खूपच गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटो मध्ये इनाया आणि तैमूर घरात एका पूलमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. तसेच याआधी नवीन वर्षापूर्वी तिने पती सैफ अली खान आणि तैमूर बरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता.
https://www.instagram.com/p/CJfmfMIp322/?utm_source=ig_web_copy_link
करीना कपूर खान गर्भवती आहे आणि ती तिच्या प्रेग्नन्सीचा आनंद घेत आहे. त्याचबरोबर ती तिच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’या चित्रपटात दिसणार आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता आमिर खान त्याच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सकाळी मोफत कोरोना लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी
- बीएसएनएलच्या ‘या’ प्लानमध्ये बदल तर ‘या’ ऑफरची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली
- ‘त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यातचं घुसला…’
- कोहली-रहाणेच्या तुलनेवर सचिनचे भाष्य
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
