🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतासाठी आता उत्तम वेळ आली आहे. आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील. संबलपूर हे मोठं एज्युकेशन हब म्हणून उदयास येत आहे. संबलपूरच्या लोकललाही व्होकल बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. जास्तीतजास्त स्टार्टअप्स हे २ टियर आणि ३ टियर शहरांमध्ये सुरू होत आहेत. शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
कोरोना महासाथीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ‘लोकलसाठी व्होकल’ होण्याचं आवाहन केलं होतं. तसंच आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे असंही ते म्हणाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील संबलपूर येथील आयआयएमच्या कॅप्सच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
देशातील नव्या क्षेत्रांमध्ये नवे अनुभव घेऊन बाहेर पडणारे मॅनेजमेंट तज्ज्ञ भारताला एका उंचीवर घेऊन जाण्यात मोलाची भूमिका निभावतील. भारतानं कोरोना महासाथीच्या संकटादरम्यानही गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक यूनिकॉर्न दिले आहेत. गेल्या दशकामध्ये भारतानं एक नवा ट्रेंड अनुभवला आहे. बाहेरील अनेक मल्टी नॅशनल कंपन्या भारतात आल्या आणि भारताच्याच भूमिवर त्यांनी विकासही केला. हे दशक आणि हा काळ भारतात नव्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या निर्मितीचा आहे. असंही त्यांनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या
- बांधकाम विभागातील बिल घोटाळ्याची चौकशी न केल्यास न्यायालयात जाऊ-अतुल भातखळकर
- सोनू सूद उतरणार राजकारणाच्या मैदानात?
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- चाहत्याने भरलेलं बिल पंतच्या आलं अंगलट; ‘त्या’ कृतीचा होणार तपास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
