🕒 1 min read
पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चा १ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.
महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट आदी नेते व इतर नगरसेवक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले होते.पहाटेच्या शपथविधी नंतर अजितदादा आणि फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने पुणेकरांना यानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळेल अशा चर्चा गेले काही दिवस चालू होत्या.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात. आज या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुणेकरांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागतो आहे. पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होता. आता मी आणि दादा एकत्र येणार असलो की दोन दिवस बातम्या चालतात आता आम्ही काय कुस्ती करणार की गाणे म्हणणार होतो. त्यामुळे अजितदादांनी एकतर माझ्याकडे चहाला यावे किंवा मला तुमच्याकडे बोलवावे, मीडियाला बातम्याच बातम्या मिळतील,’ असं मिश्किल भाष्य करत फडणवीसांनी पवारांना आमंत्रण दिलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं दिसून आलं.
महत्वाच्या बातम्या
- मी काय पुण्यातच असतो; अजित पवारांचा फडणवीसांना टोला
- ‘अजितदादा, आपण जनतेसाठी जे काम करायचं ते करायचंच’
- भारतात ‘पुणेरी’ सीरमच्या लसीला आपत्कालीन मंजुरी !
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- मुख्यमंत्री महोदय, सरकार इतके निर्दयी कसे काय झाले ? नववर्षानिमित्त पोस्टरमधून मनसेचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
