Share

मी काय पुण्यातच असतो; अजित पवारांचा फडणवीसांना टोला 

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चा १ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.

महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट आदी नेते व इतर नगरसेवक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद झाला होता. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्याची मागणी केली होती. तर,  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार बोलवायला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे या कार्यक्रमाला या दोन्ही नेत्यांना बोलवून सुवर्ण मध्य सोडण्यात आला होता.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी सभागृहात हे नेते एकाच मंचावर असले तरी दोन्ही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे आमने-सामने आल्याचं दिसून आलं. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतच मोठा जमाव करून घोषणाबाजी सुरु केली होती. आमंत्रणाच्या वादावर अजित पवार यांनी भाष्य केलं. ‘मी महापौरांना सांगितलं होतं, विरोधी पक्षनेत्यांच्या सोयीच्या वेळेनुसार कार्यक्रम घ्या. मी काय पुण्यातच असतो’ असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!