🕒 1 min read
नाशिक: जगभरात नववर्षाचा स्वागतचा जल्लोष करण्यात आला. मात्र यावर्षी नवीन वर्षाच्या स्वागतावर जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच सावट आहे. त्याच बरोबर ब्रिटनमध्ये नव्या विषानुच संक्रमण झाल असल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यूचं कटेकोरपणे पालन करण्यात आलं. यावेळी नाईट कर्फ्यू आणि सेलिब्रेशनच्या अति उत्साहात असलेल्या तरुणांना मात्र पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला आहे. तर नाशिकमध्ये महिला पोलिसांनी लेडी सिंघमची भूमिका घेत या बेभान तरुणांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
यावेळी या तरुणांना महिला पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत धू-धू धुतलं. त्याच बरोबर यावेळी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत या तरुणांना लाठ्यांचा प्रसाद दिला. तर काही तरुणांना भररस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. तर काही तरुणांची यथेच्छ धुलाई करण्यात आली आहे.
त्यामुळे ऐन नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना लाठ्या-काठ्यांचा मार आणि उठाबशा काढायची वेळ आली. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. या तरुणांमध्ये केवळ नाईट कर्फ्यूच नाही तर तळीरामांना देखील लाठीचे फटके पडले आहेत. तर वाहन वेगानं चालवणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी भररस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे. कान पकडून उठाबशा काढायला लावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन वर्ष आरोग्य क्षेत्रातल्या आव्हानांवर मात करणारं असेल : मोदी
- पुण्यातील आयटी नगर परिसरात गव्याचा वावर
- सुनील गावसकर यांच्या मते, सिडनी कसोटीत रोहितसोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग
- नूतन वर्षाचे स्वागत ‘या’ गोष्टींचा अंगीकार करून नव्या उत्साहाने करू
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे; दगडूशेठ गणपतीला भाविकांचं साकडं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
