पुणे : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंलय.
यावरून आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आतादेखील महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय, पण शिवसेना हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता वापरत आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्तीचा सुरु असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- नवीन वर्षात मीडियापासून लांब राहण्यासाठी दिपीकाने सोशल अकाऊंटवरील पोस्ट केल्या डिलीट
- धनंजय मुंडेंचा धडाकेबाज निर्णय अन् ‘त्या’ दोन्ही सावित्रीच्या लेकी आता शिकणार थेट परदेशात !
- रामदास आठवलेंनी कवितेतून दिल्या नवीन वर्षाच्या हटके शुभेच्छा !
- ‘वंडर वुमन’ची बिलकीस दादीला भेटण्याची इच्छा
- चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
