Share

रामदास आठवलेंनी कवितेतून दिल्या नवीन वर्षाच्या हटके शुभेच्छा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जगभरातील लोक नवीन वर्षाच्या उत्सवांमध्ये मग्न असून सरत्या 2020 ला निरोप देत आहेत. लोक नवीन वर्षामध्ये समृद्धीची इच्छा करुन एकमेकांना संदेश पाठवत आहेत. 2021 मध्ये कोरोना साथीच्या आजारापासून लोकांची सुटका व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा काव्यमय रित्या दिल्या आहेत.

रामदास आठवले यांची कविता 

सरते 2020 वर्ष ठरले कोरोनाच्या भीतीचे

तरीही त्यात दिसले काही लोक हिंमतीचे

कोरोनायोद्धे हिंमतीने लढले

काही कोरोनामुळे धारातीर्थीपडले

मी ही दिला गो कोरोनाचा नारा त्या विरुद्ध लढण्यासाठी

जागा झाला भारत सारा कोरोना ला गाडण्यासाठी

कोरोनामुळे जात होते कित्येकांचे जीव

लॉकडाऊन मध्ये पंतप्रधान मोदी सरकार ने केली गरिबांची कीव

लॉक डाऊन करून वाचविले जीव

अन्नधान्य वाटून वाचले गरिबांचे जीव

येणाऱ्या वर्षात कोरोना संपून जावा

सन 2021चा उगवता सूर्य सर्वाना नवजीवन घेऊन यावा!

नव्या वर्षात होऊ नये कुणाचाही कोरोनाशी सामना !

म्हणून मी देतो सर्वाना नव्या वर्षाच्या शुभकामना !

दुसरीकडे, “मावळते वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेले, येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२१ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मावळत्या २०२० वर्षाने आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्यागोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरुवात करुया. कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने मास्क लावणे, गर्दी टाळणे, हात वारंवार धुत रहाणे या त्रिसूत्रीचे पालन करुया. कोरोनापासून स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे संरक्षण करीत दैनंदिन व्यवहार हळुहळु काळजीपूर्वक सुरु करुया असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!