🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.2 जानेवारीला देशातील सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच ‘ड्राय रन’ घेतली जाईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
देशात प्रत्येक राज्यात कमीत कमी 3 ठिकाणी ही ‘ड्राय रन’ केली जाईल. काही राज्यांनी जिल्ह्यांचाही समावेश या ड्राय रनमध्ये केला आहे.दरम्यान,ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या रुपातील कोरोना विषाणूमुळे जगभरातील देशांची पुन्हा झोप उडाली आहे.
Dry run will be conducted by all the State & UT governments on 2nd Jan 2021. The activity is proposed to be conducted in all State Capitals in at least 3 session sites; some States will also include districts that are situated in difficult terrain/have poor logistical support:GoI
— ANI (@ANI) December 31, 2020
भारतात आज कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेले पाच नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ब्रिटनहून भारतात आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवार साहेब, आता तरी पीडित मुलीला न्याय देणार का?’
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- ‘…अन्यथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ऑफिस फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना मागे-पुढे पाहणार नाही’
- जिओ ग्राहकांना खुशखबर ! उद्यापासून प्रत्येक नेटवर्कवर करता येणार फ्री कॉलिंग
- डिसेंबर अगोदरच भारतात आला असू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन – एम्स संचालक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
