Share

‘मोदींनी उद्योगपतींना केलेल्या कर्जामाफीतून 11 कोटी परिवारांना प्रत्येकी 20 हजार मिळाले असते’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली:- उद्योगपतींच्या कर्ज माफ करण्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट टीका केली आहे. गुरुवारी एक ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

काँग्रेस खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 2378760000000 रुपयांचं कर्ज या वर्षी मोदी सरकारने काही उद्योगपतींना माफ केलं आहे. या रकमेतून कोविडसारख्या संकटाच्या काळात 11 कोटी परिवारांना प्रत्येकी 20-20 हजार रुपये देऊ शकलो असतो. मोदीजींच्या विकासाचं हे खरं रुप आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

याआधीही राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. कृषी कायदे, कोरोना व्यवस्थापन यांसारख्या काही मुद्द्यांवरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठकीपूर्वीही राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मोदी सरकारची आश्वासने पोकळ आणि फसवी आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला होता. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!