लखनौ : नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेली शिवसेना आता उत्तर प्रदेशातील निवडणूक लढविणार आहे.उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत आता शिवसेनाही आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या आधीच्या महत्वपूर्ण निवडणुका म्हणून पंचायत निवडणुकांकडे पाहिले जात आहे. या निवडणुका मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. मात्र यासाठी अनेक राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागलेत.
शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील राज्य प्रमुख असणाऱ्या अनिल सिंह यांनी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन पक्ष प्रभारींची नेमणूक केली जात असल्याची माहिती दिल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. सर्व जिल्ह्यांमधून प्रभारी पदासाठी अर्ज येत असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केलं.
याचबरोबरच शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील प्रतिनिधीमंडळ महाराष्ट्रामध्ये येऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका तसेच इतर महानगरपालिका आणि ग्रामीण भागांमध्ये शिवसेना कसं काम करते हे या पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील या दौऱ्यानंतर या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पूर्वांचल आणि पश्चिम बुंदेलखंडमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर यामधूनच उमेदवार निवडण्यात येतील आणि त्यांना पक्षाकडून तिकीट दिलं जाईल.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- विरोधी पक्षाने फक्त तंबूत बसून निदर्शने करावीत; शेतकरी नेत्यांची टीका
- तृतीयपंथीयांच्या मनाचा मोठेपणा; साईबाबांच्या झोळीत टाकले 11 लाखांचे दान
- ‘या’ देशात कोरोनाने घातला धुमाकूळ; एका दिवसात 53 हजार 135 रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
