Share

‘ईडी कार्यालयात आज हजर होणार होतोच मात्र कोरोना सदृश लक्षणांमुळे विश्रांतीची गरज आहे’

Published On: 

मुंबई : अगदी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने नोटीस बजावलेली आहे. ईडीकडे हजेरी लावण्याअगोदरच एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती कळत आहे. ईडीच्या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर म्हणजे आजच चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार होते.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सर्दी, ताप व कोरडा खोकल्याचा सौम्य त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वैद्यकीय तज्ञांनुसार त्यांना १४ दिवसांची विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. त्यांचा कोरोना अहवाल अद्याप समोर आला नसला तरी त्यांनी ईडीकडे १४ दिवसांच्या सवलतीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक देखील जाहीर केलं आहे.

‘आज हजर होण्यासाठी ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार हजर होणार होतोच. मात्र, २८ डिसेंबर रोजी सर्दी, ताप व कोरडा खोकल्याचा सौम्य त्रास जाणवला. वैद्यकीय तपासाअंती हे कोरोना सदृश्य लक्षणं असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार १४ दिवसांची आवश्यकता आहे. त्यानुसार ईडी कार्यालयाला कळवले असून १४ दिवसानंतर हजर राहण्याबाबत त्यांनी संमती दिली आहे. माझी प्रकृती बरी झाल्यानंतर ईडीस पूर्ण सहकार्य करणार आहे.’ अशी माहिती खडसेंनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!