🕒 1 min read
मुंबई : सध्या अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटामागे काहीना काही वादांचा ससेमिरा सुरु झाला आहे. आता गंगूबाई यांचे पुत्र बाबूजी रावजी शाह यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या सर्वांवर यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांनी ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात गंगूबाईंचा उल्लेखही करण्यात आला आहे. याचा पुस्तकावर हा चित्रपट तयार केला जात आहे
माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या धर्तीवर संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई काठियावाडी यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवायचा होता. परंतु, त्याआधीच हा चित्रपट अडचणीत आला आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले आहे की, हुसेन जैदीच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे.
संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाउनपूर्वी ‘गंगूबाई कठियावाडी’ या चित्रपटातची घोषणा केली होती. यात कामाठीपुरामधल्या देहविक्री करणार्या महिलांच्या ‘गंगूबाई’ यांचा संबंध मोठ्या गुन्हेगारांशी असल्याचे दाखवले जात आहे. यावर गंगूबाई यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन झैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात 22 डिसेंबरला खटला दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी 7 जानेवारी 2021 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- धोका पुन्हा वाढला : 2 वर्षांच्या चिमुकलीमध्येही आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
- महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये- भाजपा
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- परदेशात न्हवे तर अमीर खान ‘न्यू इयर’ भारतातचं करतोय सेलिब्रेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
