🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया आणि अभिनेता रणबीरसाठी ख्रिसमसचा दिवस खूप खास होता. कपूर कुटुंबासमवेत ख्रिसमस लंच केल्याल्यानंतर आलिया भट्टने रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी ख्रिसमस डिनर आयोजित केले होते. या लहान सेलिब्रेशनमध्ये आलियाचे आई-वडील आणि बहीण रणबीरची आई आणि मोठी बहीण रिद्धिमा कुटुंबासमवेत सामील होती.
या ख्रिसमस डिनरचे आयोजन आलिया भट्टची आई सोनी रझदान यांनी केले होते. या सेलिब्रेशनमध्ये आलियाचे वडील महेश भट्ट, आई सोनी रझदान, बहीण शाहीन भट्ट खूप आनंदी दिसत होती. यासह, रणबीर कपूर आणि त्याची आई नीतू कपूर देखील बहीण रिद्धिमा कपूर साहनी, तिचा नवरा भरत सहनी आणि मुलगी समारा सहनीसह सामील झाले होते. या सर्व व्यतिरिक्त दिग्दर्शक अयान मुखर्जीही या पार्टीत दिसले.
बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि तिच्या कुटुंबीयांसह ख्रिसमस सेलिब्रेट केल्यानंतर आलिया भट पुन्हा एकदा कामावर परतली आहे. आलियाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. इंस्टाग्रामवर याची स्वतः आलियाने माहिती दिली आहे. संजय लीला भन्साळीच्या प्रोजेक्टपूर्वी ती महाबळेश्वरमध्ये ‘आरआरआर’ च्या शूटिंगमध्ये होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- क्या दाल मे कुछ काला है ? राम कदमांनी काढला संजय राऊत यांना चिमटा
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- ‘कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय’
- परदेश दौऱ्यावर असल्याने राहुल गांधी राहणार काँग्रेसच्या स्थापना दिनाला गैरहजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
