🕒 1 min read
कोल्हापूर:- राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत महाविकास आघाडीचा प्रभाव जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये गटा-तटाचे राजकारण असते. तरीही, कोल्हापूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे जास्तीत-जास्त सदस्य विजयी होतील. आणि, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाविकास आघाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपला करिश्मा दाखवतील, अशी आशा कोल्हापूरचे पालकमंत्री आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचा एकूणच सर्व कारभार पाहिला तर, लोक आता महाविकास आघाडीलाच पसंती देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 433 पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस व महाविकास आघाडीच सत्तेवर असेल यात वादच नाही. असेही पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या-चंद्रकांत पाटील
- रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा
- ‘मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत’
- ‘सांस्कृतिक कार्य विभागाच्या घोषित पुरस्कारांची रक्कम लवकरच मानकऱ्यांच्या खात्यात जमा करू’
- शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित : मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
