🕒 1 min read
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅगन फ्लाय या जे. डब्लू. हॉटेलजवळील क्लबवर मुंबई पोलिसांनी धाड टाकली. या छाप्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींचे नाव आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, रॅपर बादशाह, हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान आदी सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यांनतर सुरेश रैना आणि गायक गुरु रंधावा तसेच हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान यांना अटक झाली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅग्नोफ्लाय पबमध्ये सुरेश रैनासह उपस्थित असलेल्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या पबवर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर, याप्रकणी 34 ग्राहकांसह 7 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, रॅपर बादशाह, हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान या सेलिब्रीटींना समज देऊन सोडण्यात आल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वाऱ्यात गेले; शिवसेनेचा मोदींना टोला
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- भारताला आत्मविश्वास हवा तरच भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो
- अण्णांची भेट घेवून भाजपनेते म्हणाले,नव्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांचे हित झाल्याचं दिसेल
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर


