🕒 1 min read
मुंबई : वर्षा अखेरीस कोरोनानंतर परिस्थिती रुळावर येत असताना लोकांकडून क्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांकडून मित्र परिवारासोबत पर्यटन करण्याच्या योजना आखल्या जातात. या दरम्यान बँकांमध्ये अनेक काम उरकण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. तर आता हि गर्दी आणखी वाढू शकते कारण सलग तीन दिवस बँक बंद राहणार आहेत.
त्यामुळे बँक ग्राहकांना बँकेत जाऊन महत्त्वाची कामं करायची असतील, तर तीन दिवसात आटपून घ्यावी लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला थेट सोमवारपर्यंत थांबावं लागणार आहे. कारण या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस बँकांना सरकारी सुट्टी आली आहे. त्यामुळे गुरुवार 24 डिसेंबरपर्यंत बँकेची कामं न उरकल्यास सोमवार 28 डिसेंबरपर्यंत थांबावं लागेल.
यामध्ये शुक्रवार 25 डिसेंबरला नाताळनिमित्त बँकांना सुट्टी असेल. तर त्यानंतर महिन्याचा चौथा बँकांना सुट्टी असते. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी येणारा शनिवार हा ‘फोर्थ सॅटर्डे’ आहे. त्यामुळेच 26 डिसेंबरलाही बँका बंद असतील. तर 27 डिसेंबरला रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँका उघडणार नाहीत. त्यामुळे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल.
ज्या ग्राहकांना बँकेत जाऊन पैसे काढणे, भरणे, चेक जमा करणे अथवा अन्य महत्त्वाची कामं करायची आहेत, त्यांनी ती गुरुवारपर्यंत करणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात या कालावधीत ऑनलाईन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस बँका बंद असतानाही तुम्ही ऑनलाईन ट्रँझॅक्शन सुरळीतपणे सुरु राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वाऱ्यात गेले; शिवसेनेचा मोदींना टोला
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- भारताला आत्मविश्वास हवा तरच भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो
- अण्णांची भेट घेवून भाजपनेते म्हणाले,नव्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांचे हित झाल्याचं दिसेल
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

