Share

करोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – पुनावाला

Published On: 

पुणे : करोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या कंपन्यांना कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर पेचातून सरकारनं वाचवावं. यासाठी तशी कायदेशीर तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी केली आहे. लस बनवताना येणाऱ्या आव्हानांबाबत आयोजित एका व्हर्च्युअल चर्चेदरम्यान त्यांनी ही मागणी केली.

ते म्हणाले की, अशा प्रकारच्या समस्यांमुळे लोकांमध्ये लस घेण्याबाबत भीती वाढू शकते. याशिवाय ते लस बनवण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे लक्ष विचलित करू शकतात. त्यांनी सांगितले की, त्यांची कंपनी हा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्याचा विचार करीत आहे.

लस दिल्यास त्याचा कोणत्याही प्रकारे विपरित किंवा गंभीर परिणाम झाला. तर, यासाठी लस निर्मिती कंपनीला जबाबदार धरले जाऊ नये. याकरीता सरकारने लस निर्मिती कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर गुन्हे दाखल होऊ नयेत, असा कायदा करावा असे पुनावाला यांचे म्हणणे आहे.

दरम्यान,गेल्या महिन्यात लस चाचणीत सहभागी झालेल्या चेन्नईमधील एका स्वयंसेवकानं लशीचा साईड इफेक्ट झाल्याचा दावा केला होता. लशीमुळे आपल्या मज्जासंस्था आणि स्मरण शक्तीला इजा पोहचल्याचं म्हणत या व्यक्तीनं कंपनीकडे पाच कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. त्यानंतर सीरमकडूनच या व्यक्तीवर चुकीचा दावा केल्याचा खटला दाखल करून १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!