Share

केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत कृषी कायद्यांच्या प्रतिचे केले तुकडे-तुकडे

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी दिल्लीला जाणारे काही महामार्ग रोखून धरले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखलं असून शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीतही तिथेच ठाण मांडला आहे. सरकारने त्यांना मोकळ्या मैदानावर हटवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आपल्या लढ्यावर शेतकरी ठाम राहिले.

या कायद्यांवरून देशातील राजकारण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा देताना विधानसभेतच कृषी कायद्यांच्या प्रति फाडून त्यांचे तुकडे-तुकडे केले. ‘कोरोना संकटाच्या काळात संसदेत इतक्या घाईघाईत कृषी कायदे मंजूर का केले गेले? राज्यसभेत तर कुठलंही मतदान घेता तिन्ही कृषी कायदे मंजूर झाले. याचा निषेध करतो आणि तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रति फाडतो. केंद्र सरकारने ब्रिटीशांहून अधिक क्रूर होण्याचा प्रयत्न करू असं आवाहन करतो,’ असा संताप देखील अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!