🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगणारे मुंबई पोलिसांच्या तपासासह राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर हा वाद शिवसेना विरुद्ध कंगना असा झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख देखील केला.
कंगना तिच्या प्रतिक्रिया ट्विटरमार्फत देत असते. ती ट्विटरवर जास्त ऍक्टिव्ह असल्याचे नेहमीच दिसले. याबाबतीत देखील ती ट्विटरमार्फतच आपल्या प्रतिक्रिया देत होती. यामुळेच उच्च न्यायालयात एका व्यक्तीने थेट कंगनाचे ट्विटर अकाऊंटच बंद करण्यात यावे यासाठी धाव घेतली होती. त्याने कंगनाची अकाऊंट ट्विटरवरून हटवावे यासाठी याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मात्र या याचिकेला विरोध केला असून कंगनाच्या वैयक्तिक अधिकारांवर गदा आणता येणार नसल्याचं म्हटलं आहे. सद्या देखील कंगना आणि अभिनेता दिलजीत यांच्यात ट्विटर वॉर सुरु आहे. कंगनाने प्रियांका आणि दिलजीतला टॅग करत ट्विट लिहिले होते की, ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी येणार खर्च ७० हजार कोटी आहे. आंदोलनामुळे इंडस्ट्री आणि छोट्या फॅक्टऱ्यांची इकॉनॉमी संथ झाली आहे. याने दंगे भडकू शकतात. दिलजीत आणि प्रियांका तुम्हाला समजतंय ना….आपल्या अॅक्शनचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. प्लीज मला सांगा..कोण याची भरपाई करेल?’. यानंतर दिलजीतने देखील कंगनाला चोख उत्तर दिलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- बालहट्टापोटी सरकारचे साडेपाच हजार कोटी खड्ड्यात; राम कदमांची टीका
- जयंत पाटील म्हणतात…शिवसेनेच्या पराभवाची येत्या काळात भरपाई करणार!
- रयतच्या बड्या अधिकाऱ्याचा पुण्यात राजीनामा; परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात
- भामा-आसखेडचं पाणी भाजपात अंतर्गत संघर्ष पेटवणार ?, अनिल टिंगरेंचा आंदोलनाचा इशारा
- ‘जो ओवैसीला खरेदी करु शकेल असा कोणी अजून जन्माला नाही आला’


