🕒 1 min read
पुणे : रयत शिक्षण संस्थेचं महाराष्ट्रातील जाळं हे फार मोठं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये रयतचं नाव घेतलं जातं. आता ही शिक्षण संस्था वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव कऱ्हाळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं राजकीयसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.
यानंतर उमटणारे प्रतिसाद व इतर काही प्रतिकूल परिणाम होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाऊले उचलल्याचं बोललं जात आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. यामागे माजी सचिव कऱ्हाळे यांच्या राजीनाम्याचं कारण असल्याचं देखील समजत आहे. पवारांच्या नेतृत्त्वात आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कऱ्हाळे हे मागील तीन वर्षांपासून पुण्यातील रयत शिक्षण संस्थेत कार्यरत होते. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अनेक उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीकडे संस्थापातळीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. डॅमेज कंट्रोलसाठी पवार काय रणनीती आखणार यावर उत्सुकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनाआरसा गाडी चालवताय, मग तुम्हाला होऊ शकते शिक्षा !
- ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार; राजेश टोपेंची माहिती
- पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मैदानी चाचण्या रखडल्या! भावी अधिकाऱ्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
- रिलायन्स जिओने 4G डाउनलोड स्पीडमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली
- शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांची मोदी सरकावर तिखट शब्दात टीका


