Share

भामा-आसखेडचं पाणी भाजपात अंतर्गत संघर्ष पेटवणार ?, अनिल टिंगरेंचा आंदोलनाचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून वादात अडकलेला भामा-आसखेड योजनेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांतच या योजनेचे पाणी धानोरी, कळस, टिंगरेनगर, येरवडा, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, नगर रस्ता भागातील सुमारे 8 लाख नागरिकांना मिळणार आहे. मात्र, या पाण्याचा वाटा इतर भागांसाठी देखील मागण्यात येत आहे. हे पाणी आल्यानंतर नगर रस्त्याला पालिकेकडून पूर्वी देण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकारास नगरसेवक अनिल टिंगरे यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे पाणी येण्यापूर्वीच भाजपमध्ये भामा-आसखेडचं पाणी भाजपात अंतर्गत संघर्ष पेटवणार असंच दिसत आहे.

याबाबत अनिल टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यात टिंगरे म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या भागाचे क्षेत्रफळ, लोकसंख्येची घनता पाहता, सध्याचे पाणी अपुरे आहे. त्यामुळे भामा-आसखेड प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, यासाठी नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने तसेच इतर मार्गातून पाठपुरावा केला.

आता हे पाणी मिळणार असतानाच, काही लोकप्रतिनिधी भामा-आसखेडचे पाणी इतर भागांना देण्यासाठी मागणी करत आहेत. याला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. आधी आमची पाण्याची मागणी पूर्ण करावी, त्यानंतर इतरांना पाणी देण्याचा विचार करावा.’

भामा- आसखेड योजनेचे पाणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डास द्यावे, अशी मागणी भाजपचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. तर नगररस्ता परिसराला सध्या दिले जाणारे पाणी भामा-आसखेड योजनेनंतर हडपसरला देण्याची मागणी नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी केली आहे. त्यामुळे टिंगरे यांनी थेट स्वपक्षाच्या आमदारांच्या मागणीवर आक्षेप घेतला आहे. या भागातील पाणीप्रश्‍नासाठी महापालिकेत भाजपचीच सत्ता असतानाही प्रसंगी मुख्यसभेत आपण आंदोलन केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्‍न आपल्याला महत्त्वाचा आहे, असे अनिल टिंगरे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!