🕒 1 min read
मुंबई: मराठी भाषिक अस्मिता जपण्याचा आग्रह धरणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नेहमीच मराठीच्या आस्मितेवरून हल्ला केला जातो. नुकतच मुंबई येथे ‘कराची स्विट्स’ नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने दणका दिला आहे. या मिठाई दुकानाच्या व्यवस्थापकाला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा मनसेने दिला होता.
मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करण्याऱ्या मनसेने मुंबईत ‘कराची स्विट्स’ नावाने दुकान सुरू असल्याचं निदर्शनास येताच आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रमध्ये वाहनांवरील मराठी नंबर प्लेट लावल्याने होत असणारी कारवाई प्रकरणी ठाकरे सरकारला पत्र पाठवले आहे.
महाराष्ट्रामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर मराठी नंबर प्लेट लावल्याने होत असणारी कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांनी यासंदर्भातील एक पत्रच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठवलं आहे. यासंदर्भात राजू पाटील यांनीच सोशल नेटवर्किंगवर पत्राचा फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे.
राजू पाटील यांनी परिवहन मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये हे पत्र महाराष्ट्रात गाड्यांना लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर सुरु असलेली कारवाई तत्काळ थांबविण्याबाबत असल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्रात विविध गाड्यांवर मराठी भाषेत नंबर प्लेट लावलेल्या आहेत. सदर गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करुन दंड वसुली करण्यात येत आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर कारवाई होत असल्याने मराठी जनांमध्ये तीव्र नाराजी परसरली आहे,” असं राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
सध्या राज्यात स्टायलिश नंबरप्लेट त्याचबरोबर मराठी नंबर प्लेट वरून वाहनांवर कारवाई सुरु आहे. त्यामुळे मराठी नंबर प्लेटसाठी दंड आकारणे म्हणजे मराठी भाषेची गळचेपी केली जात असल्याचेही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. “वास्तविक महाराष्ट्रात मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्याबाबत राज्य शासन आग्रही असले पाहिजे होते. तसा कायदाच महाराष्ट्रात केला पाहिजे होता. परंतु तसे न करता सरकारकडून मराठी नंबर प्लेटवर कारवाई करुन सोयीस्कर आपल्याच मातृभाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर भाषेचे संवर्धन व आपली मराठी अस्मिता कशी जपली जाईल, असा प्रश्न निर्माण होतो,” असं राजू पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.
https://www.facebook.com/RajuPatilMNS/posts/1609936552549047
पत्राच्या शेवटी राजू पाटील यांनी, “तरी आपण याबाबत तातडीने दखल घेऊन मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी घ्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी,” अशी विनंती परिवहन मंत्र्यांना केलीय.
मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी.
मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी. @OfficeofUT @advanilparab @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra @nitin_gadkari pic.twitter.com/LKaoKfzFwS
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) December 13, 2020
या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही टॅग केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- ‘राज्याचे मंत्री टू-व्हीलरने दिल्लीला जातात, पण आधी महाराष्ट्रात तरी दिवे लावा’
- ग्रामपंचायत निवणुकांसाठी राज ठाकरेंनी ठोकला शड्डू !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

