🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. कोरोना संकटामुळे अडचणीत आलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्याच्या प्रयत्नात असताना शेतकऱ्यांच्या लांबत चाललेल्या आंदोलनामुळे ती पुन्हा धोक्यात येऊ शकते असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने दिला आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात ३२ शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलकांनी मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडले आहे सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. मात्र, शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
शेतकरी आंदोलनामुळे अन्न धान्य व इतर शेतमालाच्या वितरणाची साखळी खंडीत होण्याची भीती आहे. आंदोलन दीर्घकाळ सुरु राहिल्यास वितरण व्यवस्था ठप्प होऊन भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. असा इशारा ‘सीआयआय’ने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- ‘राज्याचे मंत्री टू-व्हीलरने दिल्लीला जातात, पण आधी महाराष्ट्रात तरी दिवे लावा’
- ग्रामपंचायत निवणुकांसाठी राज ठाकरेंनी ठोकला शड्डू !


