🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात सद्या वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “अन्नदाता शेतकरी नाही राहिला तर काय माती आणि दगड खाऊन जिवंत राहणार आहात का? हात जोडून आपल्या अन्नदाताची माफी मागा. आम्ही शेतरकरी होतो, आहोत आणि शेवटपर्यंत शेतकरीच राहू. तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणा किंवा दहशतवादी. लक्षात ठेवा मत मागायला याल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन केआरकेने आपला संताप व्यक्त केला आहे.
हम किसान थे, किसान हैं और मरते दम तक किसान ही रहेंगे! आप चाहे हमको देशद्रोही बुलाओ या आतंकवादी! और याद रखना, तुम कल फिर हमसे से ही वोट की भीक माँगने आओगे! #FarmersAreLifeLine
— KRK (@kamaalrkhan) December 13, 2020
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही … मुनगंटीवारांची सभागृहात जोरदार टोलेबाजी
- कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देत जनहिताचे निर्णय घेतले – मुख्यमंत्री
- विधिमंडळाच्या सभागृहाच्या पटलावर ‘हे’ अध्यादेश आणि विधेयक मांडले जाणार
- आज होणाऱ्या ईडी चौकशीला पूर्वेश सरनाईकांची दांडी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
