Share

‘स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर देखील भाजपने आपल्या खासदारांना संविधानाचे शिक्षणच दिले नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नेहमीच काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेते मंडळींची काही कमी नाही. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या याच वाक्त्यांमुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या ची प्रकरणे नेहमीच समोर समोर येतात. यामध्ये आता भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल आहे.

वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

प्रज्ञा यांनी या कार्यक्रमात बोलताना जाती व्यवस्थेचे समर्थन केले. प्राचीनकाळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार करण्यात आले होते. क्षत्रियाला क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही, वैश्याला वैश्य म्हटल्यास राग येत नाही, पण शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं कारण काय आहे? जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले.

यावर आता कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा जोरदार समाचार घेतला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर देखील भाजपने आपल्या खासदारांना संविधानाचे शिक्षण दिले नसल्याचा घणाघात नितीन राऊत यांनी केला आहे. आतंकवादचे गंभीर आरोप असलेल्या प्रज्ञा ठाकूर सारखे लोक आज देखील मनुवाद आणि वर्णव्यवस्थेला खतपाणी घालत आहेत. असा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!