Share

उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन, भाजपचा चहापानावर बहिष्कार !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोमवार पासून राज्याचे दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. हे अधिवेशन यंदा कोरोनाच्या प्राश्वभूमिवर नागपूर ऐवजी मुंबईला होत आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आयोजित केले आहे.

मात्र, सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारला आलेलं अपयश, शेतकऱ्यांना विशेषत: ओला दुष्काळाचा फटका बसलेल्यांना मदत न मिळणं अशा विषयांमुळे भाजपने बहिष्कार टाकला आहे.

दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!