Share

महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला तर ‘तो’ दिवस दूर नाही -प्रफुल पटेल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ममता बॅनर्जी यांच्यापाठीशी जसे त्यांच्या राज्यातील खासदार उभे राहू शकतात तसे पवारसाहेबांच्या पाठी राज्यातील ४८ खासदार का उभे राहू शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करतानाच तसा महाराष्ट्र आजही साहेबांच्या पाठिशी उभा आहे परंतु महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही जे स्वप्न आपण पहात आहोत ते पूर्ण करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘८ दशके कृतज्ञतेची’ या विशेष कार्यक्रमात पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मला ४० वर्षे पवारसाहेबांना जवळून पाहण्याचा सौभाग्य लाभलं… मला घडवण्यामध्ये आणि मी जो काही आहे तो पवारसाहेबांमुळे अशी प्रामाणिक कबुली खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.

३० वर्षात राष्ट्रीय राजकारणात पवार साहेबांच्यासोबत आहे. मानसन्मान आज आहे तेवढाच मानसन्मान त्याकाळातही होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेव्हा जेव्हा दिल्लीला येत होते. तेव्हा फक्त आणि फक्त पवारसाहेबांकडे येत होते असे सांगताना समाजकारणात साहेबांनी कधी राजकारण केले नाही हेही खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नंतर महिलांच्यावतीने महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी साहेबांचेऔक्षण केले. कार्यक्रमाची रुपरेषा महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितली.

त्यानंतर ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बीडहून सहभागी झाले होते. त्यांनी शरद पवारसाहेबांना शुभेच्छा दिल्या. माणूस सुध्दा देवमाणूस होवू शकतो हे साहेबांनी घडवून दाखवलं आहे अशा शब्दात शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी २९ लाख दिव्यांगाना ‘महाशरद’ डिजिटल फ्लॅटफॉर्मचा फायदा होणार असून या फ्लॅटफॉर्मचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नव्या वेबसाईटचेही (www.ncp.org.in) विमोचन शरद पवार यांच्या हस्ते झाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!