Share

‘दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्याव्यात’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढल्यास भारतीय जनता पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. आता भाजप नेत्यांनी त्यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘… तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत: जयंत पाटील. दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करू नये. जयंतराव भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या… दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत…’ असं आव्हानच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देताना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!