Share

दोन दिवसांचे अधिवेशन मलाही मान्य नाही; नाना पटोलेंची जाहीर नाराजी!

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर:- कोरोना महामारीमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. हे अधिवेशन दोन दिवसांचं होणार असून ते १४ आणि १५ डिसेंबरला होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यावर भाजपसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांचं अधिवेशन आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलंय. नाना पटोले हे आज पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

अधिवेशनाचा वेळ कमी केल्याचं आपल्याला मान्य नसल्याचं नाना पटोले म्हणालेत. विधानसभेचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं पार पडावं यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून कामकाज करता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी करणं हे लोकशाहीला धरुन असल्याचं मान्य करता येणार नाही. कोरोनामुळे सभागृहात गर्दी होऊ नये यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीने अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा निश्चित केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

आमदारांना आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचं स्वातंत्र्य अधिवेशनात आहे. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागतात. कालावधी कमी असल्यानं आमदारांवरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करणं लोकशाहीला पोषक नाही, असेही पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!