🕒 1 min read
सातारा : पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रीयेसाठी विभागात 2 हजार 160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी, तर 423 निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क्स, थर्मल स्कॅनिंग आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दष्टीने सर्व प्रकारची साधनं कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. 30 नोव्हेंबर रात्री 12 नंतर मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले जाणार आहेत.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तर बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने रंगत अजून वाढली आहे. मात्र आज साताऱ्यातील शिवाजी कॉलेजमध्ये बिचकुले मतदान करण्यासाठी आले असता त्याचं नावं मतदार यादीत नसल्याचे समोर आले. मतदार यादीत नाव नसल्याचे कळताच बिचुकले यांना संताप अनावर झाला. तेव्हा, ‘आरे नाव नाही मामा माझं यादीत, जिथं उमेदवाराचे नावं नाही तिथ सर्वसामान्य मतदारचं काय होईल’ असा संताप अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला.
माझ्या पत्नीच नावं आहे पण मी उमेदवार असून माझ नाही आता मला मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे. यामागे खूप मोठ षडयंत्र आहे यामागे कुठला पक्ष आहे का ? असा सवाल देखील अभिजीत बिचुकले यांनी उपस्थित केला आहे. माझ स्टारडम यांच्या डोळ्यात खुपत मी ही निवडणूक जिंकू शकतो म्हणून माझ्या विरोधात हे षडयंत्र रचल गेल असल्याचा आरोप बिचुकले यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही : पाटील
- सावरपाडा एक्सप्रेस, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतची नोकरीसाठी राज्यपालांकडे धाव…
- धावत्या कारमध्ये थरार; मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस आमदारावर प्राणघातक हल्ला !
- ऑनलाइन खरेदीवर मिळणाऱ्या ‘कॅश बॅक’विरोधी अ. भा. व्यापारी महासंघाची तक्रार…
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग

