Share

‘सामान्य जनतेला परवडेल अशा किंमतीत कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम भारतात होणार’

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी पावणेपाच च्या सुमारास मोदी यांचं विशेष हेलिकॉप्टरने सिरम मध्ये आगमन झालं. त्यानंतर त्यांनी सिरम मधील लस उत्पादन प्रकल्पाला भेट देऊन उत्पादन प्रक्रियेचाआढावा घेतला. संस्थेतील शास्त्रद्न्य आणि अन्य अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे येऊन सीरम इन्स्टिट्युटला भेट दिल्यानंतर सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या भेटीविषयी माहिती दिली आहे.

या भेटीत कोरोनावरील लस आणि लसीकरण याबाबत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सखोल चर्चा झाली, असे पूनावाला यांनी सांगितले, कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम भारतात होणार, असल्याची घोषणा त्यांनी केली.

लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशा किंमतीत ही लस उपलब्ध केली जाणार असल्याचे पूनावाला म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!