Share

भूमीला दुर्गामती चित्रपटातील लुक मुळे करावा लागत आहे ट्रोलर्सचा सामना

Published On: 

मुंबई : नुकताच भूमी पेडणेकरचा चित्रपट दुर्गामतीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ११ डिसेंबरला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. दुर्गामती अनुष्का शेट्टीचा चित्रपट भागमतीचा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटामधील भूमिकेसाठी भूमी पेडणेकरचे कौतूक झाले तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे चाहते दुर्गामतीमुळे जास्त खूश नाहीतआणि चाहते चित्रपट आणि अभिनेत्रीची तुलना करत आहेत.

चाहत्यांचे म्हणणे आहे की भागमतीमध्ये अनुष्काने जसा परफॉर्मन्स दिला आहे तसा भूमी देऊ शकत नाही. एका चाहत्याने लिहिले की, माफीसोबत म्हणेन की तू चांगली अभिनेत्री आहे पण लेडी सुपरस्टार अनुष्का शेट्टी सारखा स्क्रीन प्रेजेंससोबत टक्कर देऊ शकत नाही. या सीनचे वेगळेच चाहते आहेत. अनुष्का शेट्टी या चित्रपटात आग होती. असो शुभेच्छा.

durgamati

दुर्गामती चित्रपटात भूमी पेडणेकर हिने चंचल चौहान नामक मुलीची भूमिका केली आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अर्शद वारसी, जिशु सेनगुप्ता, माही गिल आणि करण कपाडीया मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे पहिले शीर्षक दुर्गावती होते पण नंतर बदलून दुर्गामती केले. २०२०मध्ये भूमी पेडणेकरचा रिलीज होणारा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी ती भूत आणि डॉली किट्टी और वो चमकते सितारेमध्ये झळकली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!