🕒 1 min read
मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत दिली. ही मुलाखत शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली. वर्षा ते मातोश्री, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समन्वय, विरोधकांचे आरोप, सरकार चालवतानाची कसरत यासंदर्भात अनेक प्रश्नांची या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली.
या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना मुलाखत द्यायला हवी होती. ही मुलाखत कंगनाच्या कार्यालयात व्हायला पाहिजे होती आणि त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर चर्चा झाला पाहिजे होती. तो खरा धमाका ठरला असता. पण सरतेशेवटी मुलाखत कोणाला द्यायची हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे, असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यामध्ये संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
On 1 st Anniversary of His Gov..
Maha CM shud b givin a interview 2 Arnab 4 Republic while sitting in Kanganas off n discussin SSR death!
That’s called a DHAMAKA!
After all those were his priorities!
Ghar ke paltu doggie ko toh koi bhi biscuit khela shakta hai..No fun in that!— Nitesh Rane (@NiteshNRane) November 26, 2020
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुभेच्छा देतो. मात्र, या एका वर्षात या सरकारने कोणतीच ठोस कामे केली नाहीत. तसचे ते कुठल्याच घटकाला न्याय देऊ शकलेले नाही. सरकारने शेतकरी, दलित, आदिवासी इतकेच काय सर्वसामान्यांसाठीही काही केले नाही. त्यामुळे ही वर्षपूर्ती अपयशीच म्हणावी लागेल, अशा प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या मुलाखतीवर टीका केली आहे. दरदरून घाम फुटल्यामुळे तुमचे मर्द तूर्तास क्वारंटाईन झाले आहेत… त्यांचे सोडा तुम्ही गेले 8 महिने क्वारंटाईन आहात. आधी घराबाहेर तर पडा…असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची भाजपची हिंमत नव्हती’
- ‘शरद पवार हे सरकारचे मार्दर्शक आहेत, रिमोट कंट्रोल नाहीत’
- दरदरून घाम फुटल्यामुळे तुमचे मर्द तूर्तास क्वारंटाईन झाले आहेत,भाजपचा ठाकरेंना टोला
- मोदी सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट, प्रशासनाची जय्यत तयारी
- सरकार पाडणारी शक्ती तयार करूया; अण्णा हजारे यांचा रोख नेमका कोणाकडे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
