🕒 1 min read
जालना : पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे संकेत आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहेत. जालना येथे पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले. निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील सरकार पडणार असल्याचे दरेकर यांनी केले.
Video : Pravin darekar | पदवीधर निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली – प्रवीण दरेकर@mipravindarekar pic.twitter.com/X3xVKaRleL
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
प्रवीण दरेकर म्हणाले, “राज्यातील जनता आज त्रस्त आहे. उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल.” तुमच्या एक वर्षाच्या सरकाला जनता त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील असं मोठं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय.
रेल्वे सुरु करण्यासाठी केंद्राने मान्यता देण्याचे सूतोवाच केले असुन,याबाबत केंद्राने राज्याला कळवलही आहे.पण रेल्वे सुरु करण्यासाठी राज्याला केंद्राची परवाणगी लागते व केंद्र सरकार ती द्यायला देखील तयार आहे.पण राज्य सरकार तशा प्रकारची भूमिका घेत नसल्याचा टोलाही दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
- ‘ही’ अट मान्य असेल तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही : मनसे
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
