Share

फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करू; जयंत पाटलांनी ठोकला शड्डू

Published On: 

पुणे : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. भाजपने आत्तापासूनच ‘मिशन मुंबई’ सुरु केलं असून महापालिकेतील भ्रष्टाचार नियोजनाचा आभाव यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांना लक्ष्य केलं.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील देवेंद्र फडणवीस आणि भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यांना आम्ही चितपट करणार आहोत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाचही जागांवर महा विकास आघाडीचाच विजय होईल” असा हुंकार देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीने पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील बोलत होते. यावेळी, उद्यापासून पुण्यातील 11 तालुक्यातून संयुक्त प्रचार सुरु करणार असल्याचं सांगितलं. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार अमोल कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे आदी नेते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!