Share

वीज बिलाचा प्रश्न राज्यात पेटला असतानाच, नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तब्बल १३२ कोटी रुपयांची थकबाकी!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सर्वसामान्यांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. दरम्यान, महावितरणची घरगुती, व्यापारी, औद्योगिक (लघुदाब) ग्राहकांकडे वीज बिलाची एकट्या नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तब्बल १३२ कोटी ७ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामध्ये तब्बल १ लाख ५६ हजार ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून वीज बिलापोटी महावितरणला एकही रुपया दिलेला नाही. या ग्राहकांचीच वीज बिलाची थकबाकी ही तब्बल ७६ कोटी २७ लाख रुपये झाली आहे.

एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केल्यास या जिल्ह्यात एक एप्रिल ते १७ नोव्हेंबर या काळात घरगुती, व्यापारी, औद्योगिक (लघुदाब) या अकृषक ग्राहकांकडे तब्बल १३२ कोटी ७ लाख रुपये वीज बिलापोटी थकबाकी झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये ६ लाख ७५ हजार अकृषक ग्राहक आहेत, त्यापैकी तब्बल १ लाख ५६ हजार ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून वीज बिलापोटी महावितरणला एकही रुपया दिला नाही. या १ लाख ५६ हजार ग्राहकांची एप्रिल महिन्यापासूनची थकबाकी ही ७६ कोटी २७ लाख रुपये झाली असल्याचे महावितरणमधून सांगण्यात आले.

सर्वसामान्यांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. त्यामुळे वीज बिलात सवलत मिळेल, या आशेने अनेकांनी हे बिल भरले नव्हते. मात्र आता वाढीव वीज बिले भरावीच लागतील, असे संकेत राज्य सरकारने दिले असल्याने त्याअनुषंगाने ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कामाला लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!