मुंबई : ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी संपादित केलेल्या ‘कतृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात भाजप नेते आशिष शेलार यांनी कतृत्वान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, या भावनेला समर्थन असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आशिष शेलार यांना भावी मुख्यमंत्री संबोधले होते. त्यावर शेलार यांनी उत्तर दिले आहे.
दरम्यान, यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं.
यावेळी शेलार यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने लढवय्या मराठा स्त्रियांच्या संघर्षाचा आढावा घेतला. एखाद्या व्यक्तीने पीएचडी करावं आणि त्यावर मुंबई विद्यापीठात संशोधन व्हावं, असं हे पुस्तक असल्याचं शेलार म्हणाले. तसेच चोरमारे यांनी हे पुस्तक सावित्रीबाई फुलेंना अर्पण करून या पुस्तकातून एका जातीचं उदात्तीकरण करण्यात आल्याच्या मानसिकतेलाही छेद दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील शाळा यंदाच्या वर्षी बंदच!; आयुक्तांनी दिले आदेश
- देशात लवकरच येणार ‘खाजगी रेल्वे’ ! 16 खासगी कंपन्यांकडून अर्ज दाखल…
- ‘भाजप सरकारच्या काळात सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झालीय’
- ‘सिर्फ़ बातों की है मोदी सरकार, कुचल रही ग़रीबों के अधिकार’
- कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी वरवरा राव यांना ‘नानावटी’मध्ये हलवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

