अहमदाबाद : दिवाळीपूर्वी अहमदाबाद बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली होती. सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडालेला होता. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाल्याने तुफान गर्दी करत नागरिकांनी निष्काळजीपणा केल्याचे दिसून आले होते.
.@PMOIndia @CMOGuj @AmdavadAMC pic.twitter.com/vuWhmi3EKa
— Dr Rajiv Kumar Gupta IAS (Retd) (@drrajivguptaias) November 19, 2020
दरम्यान, देशातील इतर शहरांप्रमाणे अहमदाबाद शहरातदेखील करोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून अखेर शहरात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
गुजरातमधील व्यापाऱ्याच्या दृष्टीने गजबजलेलं शहर म्हणून ओळख असणाऱ्या अहमदाबादमध्ये आज (शुक्रवार) रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, गुजरात सरकारने २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण आता तो आदेश मागे घेण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर लोकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर : मनपाच्या २९ शाळा / कनिष्ठ महाविद्यालय २३ नोव्हेंबर पासून सुरु होणार
- मर्यादित संख्येत कार्तिकी यात्रेची परंपरा जोपासावी : आचार्य तुषार भोसले
- मतदार यादीतील नाव, पत्ता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार
- राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार!
- खडसेंपाठोपाठ भाजपचा दिग्गज नेता कोरोनाच्या विळख्यात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

