जळगाव : एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.
खडसे यांच्या पक्षांतरानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार होते. मात्र, शरद पवारांना हा दौरा रद्द करावा लागला होता. एकनाथ खडसे क्वारंटाईन असल्याने खबरदारी म्हणून हा दौरा रद्द केला होता. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली होती. आता, त्यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बिहार शिक्षणमंत्र्यांवर अवघ्या तिसऱ्याच दिवशी राजीनामा सोपवण्याची नामुष्की
- ‘…तर भाजपने पब्लिक राड्यात सामील व्हावं’; भाजपच्या समर्थनावर नांदगावकरांची प्रतिक्रिया
- ‘आता पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही’
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- ‘काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी तर नाहीच पण इज्जत सुद्धा दिली जात नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

