पुणे : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची वीट शिवसेना आणि गोऱ्हे कुटुंबीय यांच्या वतीने देण्याचा इच्छा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रकट केली होती.
ही चांदीची वीट राम मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडे दिपावली पर्वकलात व बलिप्रतिपदेच्या पुर्वसंध्येला, गोवर्धनपुजेच्या दिवशी अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे डॉ.गोऱ्हे यांनी सुपुर्द केली. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, अयोध्येत होणार्या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्य दिव्य असणार आहे.
तसेच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. अयोध्येच्या श्री राम मंदिरासाठी सर्वस्व पणाला लावणारे व सातत्याने भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या योगदान स्मृती देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत.
या दरम्यान, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या कोरोना लॉकडाऊन काळात दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या प्रवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या येथे आयोजित केलेल्या पूजेचे दर्शन घेतले व वंदन केले. स्वामी गोविंद गिरीमहाराजांचा महावस्त्र अर्पण करुन नीलम गोऱ्हे यांनी सत्कार केला.
महत्वाच्या बातम्या –
- स्वत:च्या ताकदीवर सत्ता चालवता येत नसेल तर जोडतोड करून सरकार आणलंच कशाला? : पाटील
- ‘दोन दिवसांत शनिवार वाडा उघडा अन्यथा…’ ; ब्राह्मण महासंघाचा आक्रमक इशारा
- ‘हेच मंत्री स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील’ : नारायण राणे
- आता धर्म पाहून प्रेम करायचे का? जीशान अय्यूबचा थेट सवाल
- ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला; मध्यप्रदेशात येणार कडक कायदा !

