Share

कोरेगाव भीमा प्रकरणी संशयित असलेल्या वरवरा राव यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी व तमिळ साहित्यातील कवी वरवरा राव सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर, त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली होती.

यासोबतच राव यांची ढासळती प्रकृती लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांकडून जामीन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालाकडून अनेकदा ही विनंती फेटाळण्यात आली होती. आता, न्यायालयाने वरवरा राव यांना काहीसा दिलासा दिला आहे. त्यांची प्रकृती लक्षात घेता प्रकृती लक्षात घेता न्यायालयाने त्यांना रुग्णालायात दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

न्यायालयाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार वरवरा राव यांना 15 दिवसांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलेल. तसेच वरवरा राव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचीही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!