🕒 1 min read
मुंबई : अनेक चित्रपटांमधून आपल्या कलेची छाप पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दुबईमध्ये राहणा-या कुणाल बेनोडेकर याच्याशी 2 फेब्रुवारीला साखरपूडा केला होता. गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. मात्र अखेर तिने तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली होती.
‘आमचा 2 फेब्रुवारी 2020 ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं…आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या,’ अशी फेसबुक पोस्ट सोनालीने लिहिली होती.
https://www.instagram.com/p/CHsnKcTLPs6/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, माहेरची सरती दिवाळी; लग्नापूर्वी सोनालीने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही येत्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार आहे. पण, लग्नाआधी ती माहेरी सर्वच सणवार आणि काही खास क्षणांचा आनंद घ्यायला मात्र विसरत नाहीये. हे तिची सोशल मीडिया पोस्ट पाहूनच लक्षात येत आहे.
तिनं आपल्या घरातील दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत अतिशय भावनिक असं कॅप्शनही त्यासोबत लिहिलं. माहेरची सरती दिवाळी…. असं लिहित सोनालीनं हे खास क्षण सर्वांच्याच भेटीला आणले.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाचवण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे – राम कदम
- ‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’
- ‘गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज…’
- ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर बोलू नये;राऊतांचा मनसेला टोला
- कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातून ६० लाख सह्यांचे निवेदन दिल्लीकडे रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
