Share

भारताविरूद्ध अनवाणी पायांनी मैदानात उतरत ऑस्ट्रेलियन संघ देणार ‘हा’ खास संदेश !

Published On: 

🕒 1 min read

सिडनी: भारतातील कोरोणा चा प्रादुर्भाव लक्षात घेत इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल या स्पर्धेचे आयोजन यूएई मध्ये करण्यात आल होत. त्यानंतर झालेल्या महिला टी20 स्पर्धेचे आयोजन देखील मध्येच करण्यात आलं होतं. त्यामुळे आता आयपीएल चा हंगाम संपल्यानंतर आता साऱ्यांना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली असून नियमांनुसार १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्याची सुरूवात वन-डे आणि टी २० मालिकेने होणार आहे. तर सांगता कसोटी मालिकेने होणार आहे. भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये सर्वप्रथम वन डे सामने खेळणार आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाकडून एक वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरूद्धच्या पहिल्या सामन्याआधी मैदानावर अनवाणी पायाने उतरणार असल्याचा निर्णय कर्णधार टीम पेन याने जाहीर केला आहे. वन डे सामन्यांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ मैदानावर अनवाणी अर्थात पायात बूट न घालताच उतरणार आहे. मैदानात हे सर्व खेळाडू गोलाकार उभे राहतील आणि त्यानंतर काही वेळाने आत जाऊन बूट घालून सामन्याला सुरुवात करतील.

भारताविरुद्धच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अनवाणी मैदानावर उतरणार असल्याचं कर्णधार टीम पेनने जाहीर केलं. त्याविषयी सांगताना पेन म्हणाला, “जगभरातील वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने हा निर्णय घेतला आहे. आम्ही अनवाणी मैदानात उतरून गोलाकार उभे राहू. प्रत्येक मालिकेच्या सुरुवातीला आम्ही असं करणार आहोत. वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी आम्ही असं करणार आहोत. या आधी आम्ही याची सुरुवात करू शकलो नाही पण आता आम्ही हे नक्की करणार आहोत. हा वर्णभेदाचा निषेध करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असेल”, असे टीम पेनने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!