🕒 1 min read
नवी दिल्ली: देशात अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्यात आल्यानंतर आता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) खासगीकरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता व्यवहार सल्लागार बोलींचं मूल्यांकन करतील आणि बोली प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपन्या पात्रता पूर्ण करतात अथवा नाही, तसंच या कंपन्या आर्थिकदृष्ट्या कार्य करण्यास सक्षम आहेत अथवा नाही याची पडताळणी करतील. या प्रक्रियेस दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. शुक्रवारी बीपीसीएलचा शेअर बीएसईवर ४१२.७० रुपयांवर बंद झाला. त्यानुसार सरकारची ५२.९८ टक्के हिस्सा ४७,४३० कोटी रुपये इतका आहे.
अनेक मोठ्या कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवलं आहे. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीज, सौदी अरामको, बीपी आणि टोटल यासारख्या बड्या तेल कंपन्यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या इंधन कंपनीसाठी सुरू असलेल्या बोली प्रक्रियासाठी मात्र रस दाखवला नाही. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारच्या ५२.९८ टक्के हिस्स्याच्या विक्रीसाठी अनेक कंपन्यांनी रस दाखवला असल्याची माहिती सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (दीपम) सचिव तुहिन कांत पाडे यांनी ट्विटरद्वारे दिली.
दुसऱ्या टप्प्यामध्ये सल्लागाराद्वारे यामध्ये आलेल्या बोली प्रक्रियेचं मूल्यांकन करण्यात येईल. तुहिन कांत पांडे हे या प्रक्रियेच्या व्यवस्थापनाचं कार्य करत आहेत. तर दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील बीपीसीएलमध्ये सामरिक गुंतवणूक सुरू असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. अनेक कंपन्यांनी बीपीसीएलमध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी रस दाखवला आहे. दरम्यान, या प्रक्रियेमध्ये किती कंपन्यांनी सहभाग घेतला आणि कोणकोणत्या कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या याची माहिती मात्र देण्यात आल्या नाहीत. दरम्यान, या क्षेत्राशी निगडीत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत ३ – ४ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Strategic disinvestment of BPCL progresses: Now moves to the second stage after multiple expressions of interest have been received. @PIB_India @FinMinIndia https://t.co/bDNx6gw3d2
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) November 16, 2020
रिलायन्स इंडस्ट्रीज या प्रक्रियेतील एक महत्त्वाची कंपनी असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु त्यांनीदेखील यातून माघार घेतली. बीपीसीएल कंपनीचा इंधन व्यवसायात २२ टक्के वाटा असून देशातील सर्वात मोठी रिफायनरीदेखील आहे. दरम्यान, रिलायन्स व्यतिरिक्त सौदी अरेबियातील सर्वात मोठी इंधन कंपनी सौदी अरामकोनंदेखील या प्रक्रियेत रस दाखवला नाही. तर दुसरीकडे ब्रिटनमधील बीपी आणि फ्रान्सच्या टोटल या कंपन्यांचदेखील भारतीय इंधन बाजारात प्रवेश करण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्याकडूनही या व्यवहारात रस दाखवण्यात आला नाही. रशियातील प्रमुख इंधन कंपनी रोझनेफ्टच्या नेतृत्वाखालील कंपनी नायरा एनर्जीनंदेखील बीपीसीएलमधील हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केलं होती. परंतु त्यानंतर काही कारणास्तव त्यांनीदेखील यात स्वारस्य नसल्याचे संकेत दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही’
- बाळासाहेबांचे ‘ते’ दुसरे स्वप्नही आम्हीच पूर्ण करू : छगन भुजबळ
- बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांनी ‘अशी’ वाहिली आदरांजली
- ‘भाजपा आपल्या मित्रांना निर्जीव होईपर्यंत पिळून घेतो’
- लोकांनी वीज वापरली त्याची बिलं भरावीच लागणार; ठाकरे सरकारचा सर्वसामान्य नागरिकांना शॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
