🕒 1 min read
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या 8 वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. फटाके पेटवताना झालेल्या अपघातात ही मुलगी गंभीर जखमी झाली होती अशी माहिती समोर येत आहे. संपूर्ण प्रकाराने भाजप खासदार रिता बहुगुणा आणि त्यांच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे.
प्रयागराज: पटाखे से झुलसने के कारण भाजपा सांसद रीता बहुगुणा जोशी की आठ वर्षीय पोती की मौत हो गई।
— ANI_HindiNews (@AHindinews) November 17, 2020
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, रीता बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके पेटवत होती. इतर मुलांसोबत तीदेखील घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेली होती. दिवाळीला फटाके पेटवताना चिमुरडीनं फॅन्सी ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली.
यावेळी चिमुकली तब्बल ६० टक्क्यांहून अधिक भाजली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला मुलीवर प्रयागराजच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक सुरू होते. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला एअर अॅम्बुलेन्सने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच तिने या जगाचा निरोप घेतला.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही’
- बाळासाहेबांचे ‘ते’ दुसरे स्वप्नही आम्हीच पूर्ण करू : छगन भुजबळ
- बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांनी ‘अशी’ वाहिली आदरांजली
- ‘भाजपा आपल्या मित्रांना निर्जीव होईपर्यंत पिळून घेतो’
- लोकांनी वीज वापरली त्याची बिलं भरावीच लागणार; ठाकरे सरकारचा सर्वसामान्य नागरिकांना शॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
