🕒 1 min read
नवी दिल्ली- काही देशांतील कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. कोरोना लस आली तरी कोरोना व्हायरसचे संकट टळणार नाही. असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस यांनी केले आहे.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस बोलताना म्हणाले की, कोरोनाची लस आल्यानंतर ते या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवू शकणार नाही. टेड्रोस यांनी सोमवारी बोलताना सांगितले की, लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल. परंतु, ही लस त्यांची जागा घेऊ शकणार नाही.
दरम्यान, रशियाची कोरोनावरील लस स्पुतनिक 5 नंतर आता अमेरिकेतील मॉर्डना इंक (Moderna Inc.) कंपनीनेही जीवघेण्या कोरोना व्हायरसवरील प्रभावी लस तयार केल्याचा दावा केला आहे. मॉर्डनाने दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेलं कोरोना वॅक्सिन संसर्गापासून बचाव करण्यासाठी 94.5 टक्के प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं आहे.
मॉडर्ना या अमेरिकेतील औषध उत्पादक कंपनीने विकसित करत असलेली कोरोना लस तिसऱ्या आणि शेवटच्या चाचणीमध्ये ९४.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला. मॉडर्ना कंपनी अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मदतीने ही लस विकसित करत आहे.
या लसीची ३० हजार लोकांवर चाचणी घेण्यात येत आहे. ही लस खोलीतील सामान्य वातावरणात देखील १२ तास सुरक्षित राहिल असही सांगण्यात येत आहे.यापूर्वी फायझर या कंपनीने कोरोनावरील लस 90 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला होता. या कंपनीनंतर आता मॉडर्ना या अजून एका अमेरिकन बायोटेक कंपनीने त्यांची लस 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
- दिलासादायक : कोरोनाची लस 94.5 टक्के यशस्वी असल्याचा अमेरिकन कंपनी मॉर्डनाचा दावा
- बीड जिल्हयातील कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु
- आयबीएकडून ८.५ लाख सरकारी बँक कर्मचार्यांना १५ टक्के वार्षिक वेतनवाढ जाहीर
- बनावट डिझेल प्रकरण; मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
