🕒 1 min read
उरी : देशात सद्या उत्साहाचं वातावरण आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनातून काहीसा दिलासा मिळाला असताना हा तरी सण उत्साहाने पण योग्य खबरदारी घेऊन साजरा होईल अशी भावना प्रत्येक नागरिक करत असतानाच पाकिस्तानने पुन्हा आपले नापाक इरादे पूर्ण करण्यासाठी कुरापती सुरु केल्या होत्या.
भारतात कोणताही सण आला की काही ना काही ग्रहण लावायच्या तयारीत शत्रू राष्ट्र असतात. त्यामुळेच त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील सज्ज असतं. गेले काही दिवस जम्मू-काश्मीरच्या सीमेवर गोळीबार करून भारतीय लष्कराची खोड काढून घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या पाकड्यांना जवानांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
उरी आणि पूंछ भागात भारतीय जवानांवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या चौक्याचं भारताने नष्ट केले आहेत. पाकिस्तानी बंकर उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. तर, टीव्ही ९ च्या वृत्तानुसार तब्बल ७-८ पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडलं आहे. हा आकडा अधिक असू शकतो. भारत हा शांतताप्रिय देश असून पाकिस्तानी सण, उत्सव काळात सीमेपलीकडील जवानांना शुभेच्छा देत असतो. मात्र, भारतीय सण काळात पाकडे आगळीक करत असतात.
#WATCH | 7-8 Pakistan Army soldiers killed, 10-12 injured in the retaliatory firing by Indian Army in which a large number of Pakistan Army bunkers, fuel dumps, and launch pads have also been destroyed: Indian Army Sources pic.twitter.com/q3xoQ8F4tD
— ANI (@ANI) November 13, 2020
पाकिस्तानच्या गोळीबारात दोन भारतीय जवान देखील शहिद झाल्याचं दुःखद वृत्त मिळत असून हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमधील इझमर्ग येथे युद्धविराम कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे. काही मिनिटांनंतर कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.
#WATCH | Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire along the Line of Control in Keran sector of Kupwara, earlier today.
(Video Source: Indian Army) pic.twitter.com/xxT57UkE35
— ANI (@ANI) November 13, 2020
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पुंछ जिल्ह्यातील सावजीन भागातही पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- बारामती नगरपालिकेवर फडकले काळे झेंडे; अजित पवारांनी बोलावली बैठक
- राऊतांनी थातुरमातूर न बोलता सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत – राम कदम
- ‘नुसतं भो-भो करू नकोस, सिद्ध कर’ – किशोरी पेडणेकर
- ना न्यालयाची माफी मागणार, ना ‘ते’ ट्विट हटवणार; कुणाल कामरा ठाम!
- पक्षाने पुन्हा डावललं, आता पक्ष सोडणार का? मेधा कुलकर्णी म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
