Share

लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील, नारायण राणेंचे मोठे विधान

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असं सूचक विधान भाजपा खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. “लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू,” असं नारायण राणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी यावेळी फटाके फोडण्यावर राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधावरुनही टीका केली. “दिवाळीला फटाकेबंदी करण्याच्या मताचा मी नाही. सण साजरे करण्यात तुम्ही व्यत्यय आणता. सगळीच लहान मुलं, मोठे लोक फटाके वाजवून आनंद लुटतात. तोदेखील तुम्ही घेऊ देत नाही. फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच सांगतात. सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

“मुख्यमंत्रीदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही. पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा याच्यापलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही. राज्याचा त्यांना अभ्यास नाही. ठाकरे कुटुंबीयांचे बरेच जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती. मातोश्रीवर देवाण घेवाण करुन व्यवहार होतात. आमदार, खासदारांना काही स्थान नाही,” असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

“शिवसेना शब्द पाळते असं मला वाटत नाही. भाजपासोबत युती असताना दिलेले शब्द कुठे पाळले, गद्दारी का केली मग? भाजपा केवढा मोठा पक्ष आणि शिवसेना कुठे. बिहारमध्ये शिवसेनेची काय दैना झाली..एकाचं तरी डिपॉझिट वाचवू शकले का? भाजपासोबत शिवसेनेने कोणतीही बरोबरी करु नये. महाराष्ट्र सोडून कुठेही त्यांची चांगली स्थिती नाही. महाराष्ट्रात दे ५६ आले त्यासाठी भाजपाच कारणीभूत आहे. बिहारमध्ये उमेदवार उभे केले, ५० जणांचं डिपॉझिट जप्त झालं याची लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने टीका करणं आता बंद करावं,” असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!