🕒 1 min read
बीड : राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.
या निवडणुकांआधी भाजपची डोकेदुखी वाढत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादमधून भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला.औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचेच कट्टर समर्थक असलेल्या शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, आता मुंडे समर्थकांनी केलेल्या डबल बंडखोरीचा भाजपला मोठा धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- टेलिकॉमनंतर मुकेश अंबानी करणार रिटेल क्षेत्रात प्रवेश ! अॅमेझॉन, वॉलमार्टला देणार टक्कर
- काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात – बाळासाहेब थोरात
- …तर मी भाजपमध्ये जाईल ; राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ !

