🕒 1 min read
मुंबई – अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. शनिवारी, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने मला मदत करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी तळोजा कारागृहात रवानगी करताना केली होती. मला माझ्या वकिलांशी बोलू दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे, मला बेल द्या, असंही ते म्हणाले.
अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. यातच आता, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील याप्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.
कोश्यारींनी अर्णबच्या अटकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. अर्णबला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली असं देखील ते म्हणाले आहेत. तर, अर्नबच्या कुटुंबियांना अर्णबला भेटू द्यावे, असा उद्देश देखील त्यांनी दिला आहे. यासोबतच त्यांनी अर्णबच्या सुरक्षेबाबत व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपाल यांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असे सांगतानाच एका आरोपीची बाजु घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
राज्यपाल यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला असून यावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या राज्यात प्रत्येक जेलमध्ये असणाऱ्या कैद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची जबाबदारी सरकारची असते. जेलमधील कैद्याला नातेवाईकांना भेटण्यासही परवानगी दिली जात असते. परंतु ज्यापध्दतीने राज्यपाल एक विशेष कैदी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवतात. नाईक कुटुंब बरेच महिने न्यायासाठी भटकत होते त्यांची बाजू न घेता एका आरोपीची घेणे हे योग्य नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात योगींचीच हवा; पोटनिवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होण्याची चिन्हे
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- महात्मा गांधीप्रमाणे अर्णबला त्रास दिला जातोय : संबित पात्रा
- #BoycottAmazon: अॅमेझॉन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, का व्यक्त केला जातोय संताप?
- कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
